ग्रामपंचायत तुळस

परिचय

ग्रामपंचायत तुळस

          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये तुळस ग्रामपंचायत येते. तुळस गावाच्या परिचयासाठी काही प्रमुख माहिती खालीलप्रमाणे आहे: 

  • स्थान: तुळस हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
  • प्रशासकीय माहिती: तुळस ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
  • आकर्षण: तुळस ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी श्री देव जैतीर मंदिर हे आहे.
  • गावातील प्रमुख पिके: भात-शेती, आंबा बागायत, काजू बागायत व नारळ – सुपारी.
  • उद्योगधंदे: काजू कारखाना, बांबू काम, कुंभारकाम, इ.

तुळस गावाची माहिती

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गाव हे निसर्ग सौदर्यांने व विविधतेने नटलेले व जैतिर पंचायतन देवस्थानाच्या आशीर्वादाने गुण्या गोविंदाने नांदणारे एक सुंदर गाव आहे. पर्यटकांना भुरळ पाडणारी विविध देवस्थाने व निसर्गरम्य परिसर तलाव, नदी बंधारे, शेती पर्यटन, जंगल पर्यटन, यासाठी उपयुक्त असणारा संपुर्ण परिसर आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ४४०३ एवढी असुन तुळस गाव हा वेंगुर्ले शहरापासून ११ कि.मी. वर आहे तर चिपी विमान तळापासुन सुमारे २१ कि.मी.वर आहे व सावंतवाडी रेल्वेस्टेशन पासून सुमारे १७ कि.मी.वर वसलेले आहे. तुळस हे गाव पूर्वेस वाघेरी डोंगराच्या कुशीत निवांतपणे विसावले आहे. पूर्व दिशेस तळवडा हे गाव, उत्तरेस मठ, दक्षिणेस मातोंड हे गाव आहे. तुळस हे गाव विविध वनऔषधाने नटलेला आहे. तुळस गाव प्रायोगिक तत्वावर पर्यटन गाव म्हणुन विकसित करण्यासाठी खुप सोयीस्कर आहे. त्या अनुषंगाने गावातील होतकरु, गरीब कुटुंबातील तरुण – तरुणी, महिला, वृध्द यांना एक उदरनिर्वाहाचे साधन निर्माण होणार आहे. 

सद्य स्थितीत गाव भात-शेती, आंबा बागायत, काजू बागायत व नारळ – सुपारी यासाठी प्रसिध्द आहे. गावात काजू कारखाना कार्यरत असून त्या माध्यमातुन ४०० ते ५०० कुटुंबांना रोजगार उपलब्ध होत आहे. गावामध्ये पारंपारिक बांबु काम (बुरुड काम)करणार्‍या लोकांचा व्यवसाय सुरु आहे. गावामध्ये पारंपारिक कुंभारकाम करणार्‍या लोकांचाही व्यवसाय ही मोठ्या प्रमाणावर सुरु असून त्यामध्ये ते विविध कला-कुसर करुन वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी, निर्धूर चुली, तुळशी, विविध प्रकारच्या मातीच्या मुर्त्या बनविल्या जातात. त्यामुळे गावाची कुंभारकामासाठी विशेष अशी ओळख प्रसिध्द आहे. गावामध्ये येणारे विविध पर्यटक मोठ्या आवडीने सदरच्या मातीच्या वस्तू तुळस गावची ओळख म्हणून खरेदी करुन आपल्या घरी  नेतात. गावामध्ये व्यायाम शाळा, कला केंद्र, सांस्कृतिक केंद्र, वाचनालय, उपलब्ध आहे त्यामुळे पर्यटकांच्या सोई-सुविधामध्ये भर पडलेली आहे. गावातील सर्व वाडीमध्ये जाण्यासाठी रस्ते उपल्ब्ध आहेत.

श्री जैतिर मंदिर
गावाच्या मध्यभागी श्री जैतिर मंदिर आहे. भव्य दिव्य अशा स्वरुपात हे प्राचीन मंदिर आहे. “श्री देव जैतीर” संस्थान, “तुळस” हे कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस ह्या गांवी असून हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. हे जिल्हा पातळीवर प्रसिध्द असून येथे दर वर्षी वैषाख अमावास्येला “श्री देव जैतीर” चा उत्सव असतो व जैतीरा पासून अकराव्या दिवशी “कवळास” हा उत्सव असतो व तो श्री देव जैतीराच्या कृपाशिर्वादाने पार पडतो. श्री देव जैतीराच्या दर्शनांस जाण्यासाठी वेंगुर्ल्याहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२२ ने वेंगुर्ला पावर हाऊस-अणसूर तिठा-नाबर रोड-श्री देव जैतीर मंदीर असा सहज सुलभ प्रवास आहे किंवा जर सावंतवाडी मार्गे यायचे असेल तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२३ ने सावंतवाडी एस्.टी.स्थानक-मळगांव-तळवडा-होडावडा-कुंभारटेंब – श्री देव जैतीर मंदीर असा सहज सुलभ प्रवास आहे. हे गाव “श्री देव जैतिर” व “श्री देवी सातेरीच्या” छत्रछायेखाली विविध जाती बांधवांसह गुण्या गोविंदाने नांदत आहे.

ग्रामपंचायतीची रचना

ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत तुळस

स्‍थापना – १५ मार्च १९५६

0
महसूल गावे संख्या
सदस्य संख़्या
एकूण वाड्यांची संख़्या
0
एकूण वॉर्ड संख़्या
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
पूर्ण प्राथमिक व प्राथमिक शाळा
एकूण कुटुंबे
दारिद्रय रेषेखालील कुटुंबे
दारिद्रयरेषेवरील कुटुंबे
अंगणवाडी व मिनी अंगणवाडी
सार्वजनिक विहीर
खाजगी विहीर
विंधन विहीर
नळयोजना खाजगी कनेक्शन
0
एकूण वाचनालय
0
प्राथमिक आरोग्य केंद्र
0
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र
0
खाजगी दवाखाने

ग्रामपंचायत तुळस

तुळस ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय तुळस
गाव : तुळस
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क क्र. : (०२३६६) २६५२२९
ई-मेल : tulas07@gmail.com

Scroll to Top