श्री जैतिर मंदिर
गावाच्या मध्यभागी श्री जैतिर मंदिर आहे. भव्य दिव्य अशा स्वरुपात हे प्राचीन मंदिर आहे. “श्री देव जैतीर” संस्थान, “तुळस” हे कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस ह्या गांवी असून हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. हे जिल्हा पातळीवर प्रसिध्द असून येथे दर वर्षी वैषाख अमावास्येला “श्री देव जैतीर” चा उत्सव असतो व जैतीरा पासून अकराव्या दिवशी “कवळास” हा उत्सव असतो व तो श्री देव जैतीराच्या कृपाशिर्वादाने पार पडतो. श्री देव जैतीराच्या दर्शनांस जाण्यासाठी वेंगुर्ल्याहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२२ ने वेंगुर्ला पावर हाऊस-अणसूर तिठा-नाबर रोड-श्री देव जैतीर मंदीर असा सहज सुलभ प्रवास आहे किंवा जर सावंतवाडी मार्गे यायचे असेल तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२३ ने सावंतवाडी एस्.टी.स्थानक-मळगांव-तळवडा-होडावडा-कुंभारटेंब – श्री देव जैतीर मंदीर असा सहज सुलभ प्रवास आहे. हे गाव “श्री देव जैतिर” व “श्री देवी सातेरीच्या” छत्रछायेखाली विविध जाती बांधवांसह गुण्या गोविंदाने नांदत आहे.



